स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागामार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्युएसी समन्वयक डॉ.धनंजय गोंड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन व कार्या बद्दलची सविस्तर माहिती पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तर उपप्राचार्य डॉ.धनंजय गोंड यांनी राष्ट्रीय एकात्मता दिवसांची शपथ विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यानी भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम् या घोषणा देत अभिवादन केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी तर आभार प्रा.आकाश कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.शेषनारायण जाधव, प्रा. नयन भालेराव, प्रा. रशिद दायमी,प्रा. आसिफ दायमी,प्रा. सोनल सोनफुले, प्रा. ऋतुजा दिग्रस्कर, प्रा. राखी शिंदे, आवेज शेख, नावेद मणियार, अनुजा चव्हाण, त्वरिता मिटकरी, अमोल भटकुळे, अमोल मसुरे, अपर्णा काळे, शेख मुस्तकीम, मुंजेवर आवेज, दर्शन धनुरे, पाटील प्रशांत, श्रीपाद पांचाळ यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व स्वयं सेवकानी सहकार्य केले.
0 Comments