ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदयगिरी अकॅडमीची SSC बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी - शहरातील सर्व नामांकित शाळेतील Topper उदयगिरी अकॅडमीचेच

उदयगिरी अकॅडमीची SSC बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी - शहरातील सर्व नामांकित शाळेतील Topper उदयगिरी अकॅडमीचेच

उदगीर : उदगीर शहरातील अग्रगण्य शैक्षणिक चळवळ उदयगिरी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उदगीर शहरातील सर्व नामांकित शाळेत TOP करण्याचा सन्मान मिळविला आहे. विद्या वर्धिनी शाळेतून सर्वप्रथम श्वेता डिगोळे(100%), लाल बहादूर शाळेतून सर्वप्रथम वैभव एकंबेकर( 100%), श्यामलाल विद्यालयातून सर्वप्रथम सृष्टी बिराजदार (100%), पृथ्वीराज जाधव ( गणित-100), पूनम कोनाळे( गणित-100), श्रेया भंडारे (100%), पार्थराजे चेरेकर( 99.60%), भूमिका वासरे (99.80%), वैष्णवी बिराजदार (99.60%), वेदिका गव्हाणे (98.20%), सुमीत वाघमारे (98.20%), रोहित कांबळे (98.20%), श्रेया पुल्लागौर (98.20%), चेतक जाधव (98%), आदित्य पाटील, सूर्यशीला पाटील, पृथ्वीराज जाधव, सर्वेश चन्नावार , धीरज जाधव, विश्वजीत पवार, कृष्णा तांदळे, शुभम केंद्रे, रुपाली शिंदे, प्राची बिरादार, प्रतुला कस्तुरे, अजित जाधव, प्राची केंद्रे, श्रेयस सावरगावे, अथर्व चेरेकर, साक्षी पाटील अश्या एकूण 33 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण व 47 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. गणितात 100 पैकी 100 घेणारे 5 विद्यार्थी, Science मधे 100 पैकी 99 घेणारे 4, इंग्रजीत 100 पैकी 99 व 98 घेणारे 3 तर संस्कृतमधे 100 पैकी 100 घेणारे 9 विद्यार्थी आहेत. 
            या सर्व गुणवंतांचा सत्कार उदयगिरी अकॅडमीची पहिल्या बॅचची विद्यार्थीनी डॉ.ऋतुजा अंबुलगे, अकॅडमीचा माजी विद्यार्थी यावर्षीचा NEET topper शेरे वैभव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा.मीनाताई हुरदळे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे आदींनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post