उदगीर - जळकोट तालुक्यातील रस्ते रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजुर
खासदार सुधाकर शृंगारे यांची माहिती
उदगीर : उदगीर - जळकोट तालुक्यातील रस्ते रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी बोलताना सांगितले.
उदगीर तालुक्यातील जानापुर ते उदगीर राज्य सीमा रस्त्याच्या बांधकामासाठी १८ कोटी रुपये तर राणीसावरगाव , खंडाळी, काळेगाव - अहमदपूर शिरुर - उदगीर मार्गासाठी १५ कोटी रुपये असे एकुण ३३ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचे लातूरचे खासदार
सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.
उदगीर मतदार संघात आजपर्यंत विविध रस्ते मंजूर केले असुन त्यासाठी कोट्यावधीचा निधी आपण मंजूर केला असुन ग्रामीण भागाला शहराला जोडून या भागातील दळण - वळणाला चालना देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याचेही खा.श्रृंगारे यांनी यावेळी सांगितले. लातुर जिल्ह्यातील उर्वरीत रस्ते ही लवकरच आपण पूर्ण करणार असुन त्यासाठी लागेल तेवढा निधी केंद्र शासनाकडुन उपलब्ध करुन घेणार असल्याची ग्वाही खा.श्रृंगारे यांनी दिली आहे.
परवाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून लातुर लोकसभा मतदार संघातील रस्त्यासाठी ६८ कोटी रुपये मंजूर करुन घेतले असुन जानापुर ते उदगीर राज्य सीमा रस्त्याच्या बांधकामासाठी १८ कोटी रुपये तर राणीसावरगाव , खंडाळी, काळेगाव - अहमदपूर शिरुर - उदगीर मार्गासाठी १५ कोटी रुपये, अहमदपूर हासामी - सावरगाव ठोट - सोरगा - वडगाव - होकर्णा केकतसिंदगी - रस्त्यासाठी १५ कोटी रुपये असे एकुण ६८ कोटी रुपये मंजूर केल्याने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments