दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर दुकानदारांचा मोर्चा धडकणार - राज्याध्यक्ष डी. एन. पाटील
उदगीर येथे रास्त भाव दुकानदारांचा मेळावा
उदगीर : उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपुर या चार या तालुक्यातील रास्त भाव दुकानदाराचा मेळावा घेण्यात काल उदगीर येथे घेण्यात आला.
या मेळाव्यात शासनाच्या धोरणा विरुद्ध अनेक ठराव मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे डि. एन. पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा अध्यक्ष हंसराज जाधव हे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, शिवाजीराव माने, नितीन देशमुख, पंडित गुट्टे, संघटनेचे उदगीर तालुकाध्यक्ष रणजीत सोमवंशी पाटील , कुमार पाटील, रवि बावगे सह चेअरमन उपस्थित होते .
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना डी. एन. पाटील म्हणाले, रास्त दुकानदाराचे राशन वाटप करू नये त्यांची वेळेत कमिशन न देणे त्यानंतर धान्य ऐवजी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नावे थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या या शासनाचे निर्णयावर नाराजी व्यक्त करुन शासनाने घेतलेले धोरण हे चुकीचे असून रास्त भाव दुकानदारांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 50, हजार रुपये द्यावे व रास्त भाव दुकान बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर २२ मार्च २०२३ रोजी मोर्चा काढून रास्त भाव दुकानदाराच्या विविध समस्या निवेदन व्दारे शासनाकडे मांडणार असल्याची माहिती राज्यध्यक्ष डी. एन. पाटील यांनी बोलताना दिली.
यावेळी उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपुर या चार तालुक्यातील रास्त भाव दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments