ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2023 च्या अध्यक्षपदी अजित पाटील तोंडचिरकर

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2023  च्या अध्यक्षपदी अजित पाटील तोंडचिरकर

उदगीर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यासाठी  2023 च्या सार्वजनिक जयंती महोत्सवाची समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्व संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, संचालक, विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. 
या सर्वांच्या उपस्थितीत सर्वानुमते किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजित पाटील तोंडचिरकर यांची सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.अजित पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्ष आपली कामगिरी बजावली आहे. सध्या ते राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष,  विविध कार्यकारी सोसायटी संचालक, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून धुरा सांभाळत आहेत.अशा या युवा नेतृत्वाची निवड झाल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,माजी आमदार गोविंद केंद्रे,माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव,माजी आमदार शिवराज तोंडचिरकर,माजी नगराध्यक्षा उषा कांबळे,किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे, किसान शिक्षण मंडळाचे सदस्य नामदेवराव चामले,माधवराव पाटील,नवनाथ गायकवाड यांच्या शुभ हस्ते अजित पाटील यांचा शाल, बुके देऊन सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
 यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती तथा तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, रा.काँ. चे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, गोपाळकृष्ण घोडके,शाम डावळे, मनोज चिखले,ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील शिरोळकर, मनोज कनाडे, मंजूर  पठाण, शहाजी पाटील,माजी नगरसेवक दत्ता पाटील, सतीश पाटील मानकीकर यांच्यासह हजारो शिवप्रेमी यांची यावेळी उपस्थिती होती .  या निवडीबद्दल अजित पाटील तोंडचिरकर यांचे शिवप्रेमी बांधव, मित्र परिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post