चिमाचीवाडी येथील निवडणूक बिनविरोध
सरपंच पदासह एकूण सात सदस्यांची निवड
उदगीर : तालुक्यातील 26 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये चिमाचीवाडी हे गाव सरपंच पदासह एकूण सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यात सरपंच दुर्गावाढ मीरा पंढरी हे बिनविरोध तर सदस्य म्हणून गुंडीले रामदास किशन ,चंदे सुनंदा हरिदास,जाधव कालिंदा वामन,बंडे प्रशांत गोपीनाथ, गुणाले रंजना नामदेव, गुरमे अनिल माधवराव, दुर्गावाढ मिनाक्षी प्रमोद हे सद्स्य बिनविरोध आले असुन त्यांचा प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक प्राधिकरत अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे ,संतोष धारशिवकर ,कल्याण पाटील , निवडणूक निर्णय अधिकारी दंडे व्ही. आर. , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काळे एम.पी. व मंडळ अधिकारी गणेश हिवरे ,शंकर जाधव, तलाठी कुलदीप गायकवाड,अमोल रामशेट्टी, पवार देवप्रिय,बाबासाहेब कांबळे आदिउ उपस्थित होते.
0 Comments