GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री भुट्टो यांचा उदगीर भाजपकडून निषेध


पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री भुट्टो यांचा उदगीर भाजपकडून निषेध


उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानचा विदेश मंत्री बिलावल भुट्टो झरदारी याने खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह विधान केल्यामुळे उदगीर शहर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलावल भुट्टो यांचा पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, बसवराज पाटील कौळखेडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, उत्तरा कलबुर्गे, यलमटे, साईनाथ चिमेगावे, सुनील सावळे, दिलीप मजगे, बालाजी गवारे, अमोल निडवदे, रुपेंद्र चव्हाण, मंदाकिनी जीवने, सरोजा वारकरे, वर्षा धावारे, मधुमती कनशेट्टे,  दयानंद कांबळे, संगम अष्टुरे, वसंत शिरसे, बाळासाहेब पाटोदे, रामेश्वर पवार, आंनद बुंदे, प्रा. पंडित सूर्यवंशी, सुनील गुडमेवार, राजेंद्र केंद्रे, गणेश गायकवाड, सतीश उस्तुरे, व्यंकट काकरे, सुजीत जीवने, अनिता बिरादार, रंजिता सांडवे, रमाबाई वाघमारे यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची उंची नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीचे विधान केले. त्यांच्या या विधानाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेचे व पाकिस्तान च्या झेंडा जाळला. शिवाय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments