ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अतिक्रमण न काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ "तिरडी" आंदोलन

अतिक्रमण न काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ "तिरडी" आंदोलन

अतिक्रमण निघेपर्यंत मराठी पत्रकार संघाचा तिव्र आंदोलनाचा पावित्रा
उदगीर : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतचा होत असलेल्या शंभर फुटाच्या मुख्य रस्त्याचे काम शंभर फुटांमधील सर्व अतिक्रमणे काढूनच रस्ता करावा या मागणीसाठी गेल्या 69 दिवसापासून मराठी पत्रकार संघ व इतर पत्रकारांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन चालू असून याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज अतिक्रमण न काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोध म्हणून "तिरडी" आंदोलन काढण्यात आले.
या तिरडी आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, मनसेचे जळकोट तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे,शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, बापुराव जाधव,रामभाऊ कांबळे,बालाजी पवार,नामदेव राठोड,अजय भंडे,बिरबल म्हेत्रे,रामदास तेलंगे,प्रशांत घोणसे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सुनिल हावा पाटील, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगिरथ सगर, सहसचिव सुधाकर नाईक, सदस्य बस्वेश्वर डावळे, नागनाथ गुट्टे, संगम पटवारी, अंबादास अलमखाने, अरविंद पत्की, बाबासाहेब मादळे, दत्ता गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे राजकुमार माने, बालाजी कसबे, देवा घंटे, व्यंकट थोरे, जावेद खादरी, शेरुभाई शेख, महाराष्ट्र अभियांत्रिकी श्रमिक संघटनेचे बाबासाहेब सुर्यवंशी, मांस संघटनेच्या महिला अध्यक्षा उषा भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी उमा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यावरून तिरडी घेऊन विविध ठिकाणी विसावा सोडत अतिक्रमण न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देवुन हलगीच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिरडी ठेवून निषेध व्यक्त केला. 
यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक व नवनाथ महाराज यांचाही ग्रुप या तिरडी आंदोलनात सहभागी झाला होता.
मराठी पत्रकार संघाच्या व इतर पत्रकारांच्या वतीने या ६९ दिवसाच्या धरणे आंदोलना दरम्यान पत्रकारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी.एस. पांढरे, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सार्वजनिक बांधकाम विभागाचे लातूरचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदींना प्रत्यक्ष भेटुन तोंडी व लेखी निवेदन देवून अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.


Post a Comment

Previous Post Next Post