ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जळकोट शहराच्या पाणी पुरवठयासाठी सुमारे 45 लाखचे एक्स्प्रेस फिडर मंजूर : पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे

जळकोट शहराच्या पाणी पुरवठयासाठी सुमारे 45 लाखचे एक्स्प्रेस फिडर मंजूर : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे 

उदगीर  : जळकोट शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी माळहिप्परगा तलावावर एक्स्प्रेस फिडर बसविण्यात येणार असून यासाठी सुमारे 45 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीर, जळकोटचे आमदार संजय बनसोडे यांनी जनस्तंभ न्युज नेटवर्कशी बोलताना दिली.
  
 जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण सन 2021या आर्थिक वर्षातंर्गत महाराष्ट्र सुवर्ण जंयती नगरोत्थान महाआभियान योजनेतून जळकोट शहर पाणी पुरवठा योजनेसाठी माळहिप्परगा तलाव येथील पाणी पुरवठा योजना येथे एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतल्यास जळकोट शहराचा पाणी पुरवठा सुव्यवस्था होण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने एकुण अंदाजपत्रकीय रक्कम 45 लाख रक्कम मंजूर करण्यात आली आहे.  यामुळे जळकोट शहराला पाणी पुरवठातील वीजमुळे  होणारी अडचण दुर होणार आहे यामुळे अंखड वीज पुरवठा होणार आहे. जळकोट शहराला पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू राहणार आहे अनेक दिवसांपासून यासाठी प्रयत्न केले जात होते शहराला माळहिप्परगा येथून पाणी पुरवठा होत असतो या ठिकाणाहून शहरात पाणी पुरवठा करताना वीजेमुळे अनेक समस्यांना समोर जावे लागत होते या एक्स्प्रेस फिडरमुळे ही समस्या दूर होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post