GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदयगिरीच्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

उदयगिरीच्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

 उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्ष 2021 - 2022 निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शालेय व महाविद्यालय अशा दोन गटात घेण्यात आली असून दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे बक्षिसे देण्यात आली. शालेय स्तरासाठी 'वृक्ष संवर्धन काळाची गरज' तर महाविद्यालय स्तरासाठी 'वृक्ष आणि मानवी जीवन' या विषयावर मराठी भाषेत निबंध मागवण्यात आले होते. या स्पर्धेत शालेय स्तरातून श्यामलाल मेमोरियल हायस्कूल, उदगीर येथील कु. पाठक अनुष्का आशिष प्रथम, विद्यावर्धीनी हायस्कूल, उदगीर येथील कु.पटवारी श्रद्धा सुनिल द्वितीय, अक्षरनंदन विद्यालय, उदगीर येथील कु. जंभाले वैष्णवी परमेश्वर तृतीय तर लालबहादूर शास्त्री विद्यालय, उदगीर येथील कु. पाटील प्राची विकास व छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, उदगीर येथील मोतिरावे नागेश बालाजी या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. महाविद्यालय स्तरातून शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथील कु. जोशी ज्योती ज्ञानोबाराव प्रथम, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर  येथील कु. गिरी पुजा नारायण द्वितीय, कृषी महाविद्यालय, उदगीर येथील कु. राठोड अनिता मेघनाथ तृतीय तर फार्मसी महाविद्यालय, उदगीर येथील पठाण अमीर कमरोद्दीन व हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील कु. सुर्यवंशी नम्रता शिवराज या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप होते. सदरील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, मराठी अभिनेते सयाजी शिंदे, म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रवीण जाहूरे, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, डॉ. अर्चना मोरे, प्रा. अश्विन वळवी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments