उदगीर मतदार संघातील होणारी
रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत - राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
उदगीर : मतदार संघात राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाची होत असलेली कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. व ही कामे वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
उदगीर शहरातील शिवाजी चौक ते उड्डाणपूल या रस्त्याच्या रुंदीकरण, शेल्हाळ रोड-तोंडचिर-मुरकी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, उदगीर-मादलापूर-येणकी रस्त्याचे उदघाटन व उमा चौक ते तोंडार पाटी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ना. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, कल्याण पाटील, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार येणकीकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, विजय निटूरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गजानन सताळकर, बालिका मुळे, प्रा.शिवाजी देवनाळे, प्रा. प्रवीण भोळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, जे चांगलं ते उदगिरला हवं हा उद्देश ठेवून आपण काम करीत असून अनेक विकासाच्या योजना उदगीर मतदारसंघासाठी खेचून आणल्या आहेत. मतदारसंघात होणारी सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले.


Post a Comment