GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - राज्यमंत्री संजय बनसोडे


हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - राज्यमंत्री संजय बनसोडे

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हवा गुणवत्ता तपासणी केंद्राचे उद्घाटन 


उदगीर :  येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र  विभागाला दोन वर्षासाठी उदगीरच्या हवा प्रदूषणाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने हवा गुणवत्ता तपासणी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने पर्यावरण राज्यमंत्र संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, प्रकल्पप्रमुख व पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांची उपस्थिती होती.
     यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले, पर्यावरण संरक्षणासाठी तसेच प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. वाढत्या  लोकसंख्येमुळे प्रदूषणात भर पडत आहे परंतु हवेच्या गुणवत्ता तपासणी केंद्रामुळे काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊन याबाबतची यंत्रणा निर्माण करण्यात येईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी केले. यावेळी डॉ. पटवारी म्हणाले, सुप्रसिद्ध नियतकालिक लॅन्सेट च्या अहवालानुसार भारतामध्ये मागील वर्षी 17 लाख लोकांना हवा प्रदूषणामुळे आपला जीव गमवावा लागला. ही आकडेवारी भारताच्या एकूण मृत्युदरापैकी 18 टक्के आहे. याच्या व्यवस्थापनासाठी भारताच्या जीडीपीच्या 1.4 टक्के म्हणजे दोन लक्ष साठ हजार करोड इतका खर्च करावा लागतो म्हणजे भारताच्या आरोग्य विभागाच्या बजेटच्या चौपट आहे. एकूण हवेच्या प्रदूषणापैकी औद्योगिक स्तरावरून 51%, वाहन 27 टक्के, शेतीतील उर्वरित तण  जाळण्यामधून 17 टक्के तर फटाके 5 टक्के  एवढे प्रदूषण होते. या वाढत्या हवा प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी  सर्वस्तरातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी हवा तपासणी मशीनची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, लातूर येथील उपविभागीय अधिकारी शेळके यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.

Post a Comment

0 Comments