GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

बुथ निहाय पक्षाची बांधणी करा : जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील


बुथ निहाय पक्षाची बांधणी करा : जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील 

तिरु बॅरेजचे उद्धाटन आम्हीच करणार 


उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो त्याचाच एक भाग म्हणून आपल्या  पक्षाच्या 
सर्व कार्यकर्ते्यांनी सर्व समाजातील घटकांना सोबत घेवुन न्याय हक्कासाठी काम करावे. येत्या काळात पक्षाची बुथ निहाय बांधणी करुन पक्षवाढीसाठी काम करुन युवकांनी पुढे यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
ते उदगीर येथे आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'परिवार संवाद' कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील, माजी खा.जयसिंग गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समिर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, विद्यार्थी सेलचे प्रदेश सरचिटणीस आशिष वाघमारे, सेवादलाचे नवनाथ गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कोयले, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, सामाजिक न्याय विभागाचे मुकेश भालेराव, युवती जिल्हा उपाध्यक्षा सुष्मिता माने, तालुकाध्यक्षा वाघमारे, शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे, डाॅक्टर सेलच्या शहरध्यक्षा डाॅ.भाग्यश्री घाळे, शिवाजीराजे केंद्रे, सतिश गायकवाड, विनोद गुरमे, अजय शेटकार यांच्यासह जळकोट येथील सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व प्रत्येक सेलच्या तालुका प्रमुखापासुन ते सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नाचे समाधान केले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांसह मित्र पक्षाचे व त्यांना मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाचे सर्वासर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानुन मतदार संघात केलेल्या विकास कामाचा आढावा यावेळी सादर केला.
यावेळी उदगीर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वतीने ना.जयंत पाटील यांचे क्रेनने पुष्पहार घालुन जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाम डावळे यांनी केले तर आभार प्रवीण भोळे यांनी मानले.

######
आम्ही ना.संजय बनसोडे यांना महाराष्ट्राचे नेते म्हणून बघतोय असे गौरवोव्दार प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी काल झालेल्या 'परिवार संवाद' कार्यक्रमाप्रसंगी केल्याने अनेक वर्षानंतर मागासवर्गीय समाजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मोठ्या कष्टाने उदगीर जळकोट मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी ना.संजय बनसोडे यांनी उभी करुन प्रत्येकाचे काम केल्याने व सर्व सामान्याच्या सुख दु:खा प्रसंगी धावुन आल्याने त्यांना तुम्ही आमदार केले व आम्ही महाराष्ट्रात एक मागासवर्गीय चेहरा म्हणून त्यांना गरिबांच्या सेवेकरीता मंत्रीपदाची संधी दिली असुन आता त्यांच्या मागे तुम्ही ताकद उभी करा असे आवाहनही ना.जयंत पाटील यांनी कार्यकर्तांना केले. 



Post a Comment

0 Comments