भारतीय लहुजी सेना अध्यक्ष पदी शाम वाघमारे यांची निवड
उदगीर - भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडी मौजे लोणी येथे संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष पदी शाम मनोहर वाघमारे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर लोणी शाखा अध्यक्ष पदी प्रभाकर गुलफुले, उपाध्यक्ष रामेश्वर गायकवाड, सचिव नितीन डुकरे, सहसचिव नारायण सुर्यवंशी, संघटक गणेश गुलफुले, पवन वाघमारे, सदस्य दिलीप गुलफुले, संदेश चव्हाण, नितीन वाघमारे, कृष्णा गायकवाड, गोरोबा गुलफुले,प्रकाश गुलफुले, लक्ष्मण सुर्यवंशी, बलवान सुर्यवंशी, सचिन वाघमारे, अमित गायकवाड, सतिश सुर्यवंशी इत्यादी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रंजित बार्हाळीकर, मराठवाडा कायदेविषयक सल्लागार ॲड. लक्ष्मीकांत दुधकवडे, नांदेड संपर्क प्रमुख के. एम. दहिकांबळे, लक्ष्मण वाघमारे,यादव ढाले,केशव वाघमारे, दत्ता वाघमारे ,राजकुमार वाघमारे इत्यादींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन निवडी जाहीर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नितीन नवनाथ वाघमारे यांनी केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments