ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कोरोनात मृत्यू झालेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कुटूंबियाना मोफत खते व बियाणे वाटप राष्ट्रवादी काॅॅग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भरत चामले यांचा पुढाकार

कोरोनात मृत्यू झालेल्या अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कुटूंबियाना मोफत खते व बियाणे वाटप

 राष्ट्रवादी काॅॅग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भरत चामले यांचा पुढाकार

    उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  २२व्या वर्धापन दिनानिमित्त उदगीर तालुक्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या अल्पभूधारक  शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्याचे कापूस पणन महासंघाचे संचालक तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी मोफत बियाणे व खत वाटप केले.
  खा. शरदचंद्र पवार नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे डायरेक्टर तथा  स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले संकल्पनेतुन उदगीर तालुक्यातील कोरोणाने मृत्यू झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे व सेंद्रिय खत यांचे मोफत वाटप केले.         या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे पाटील, शेल्हाळ विकास सोसायटी चेअरमन किशनराव मोरे, तोंडचिर सोसायटी चेअरमन शिवाजी पाटील, पिंपरी सोसायटी चेअरमन शिवकुमार पांडे, लोहारा सोसायटी चेअरमन शेषेराव हेळगे,दावणगाव चेअरमन रमेश भंडे आदी उपस्थित होते.
    यावेळी  तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी ,मी अनेक तालुक्यात काम केली पण तेथे खरेदी-विक्री संघाचे काम ऐकिवात आले नाही,पण मी उदगीर तालुक्यात आल्यापासून येथील खरेदी-विक्री संघाचे शेतकऱ्यांविषयाचे मौलिक कार्य पाहून एक छोटी संस्था सुद्धा शेतकरी व लोक हिताची चांगले कामे करू शकते. याबदल संघाच्या कार्याच कौतूक केले. यावेळी बाबुराव आंबेगावे, व्यंकटराव पेठे, शेकापूर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, नावंदी सोसायटीचे चेअरमन बालाजी परगे, युवराज कांडगिरे, आदींसह तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार युवराज कांडगिरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post