उदगीर शहरातील ८ कृषी दुकानाचे परवाने निलंबित
उदगीर : खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हयातील पोर्टलवरील यादी प्रमाणे अनुदानित रासायनिक खताचा जास्तीचा साठा असलेल्या ई- पॉस व्दारे विक्री करणाऱ्या दुकानाची तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने खत निरीक्षका मार्फत सदर दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ई-पॉस मशीन वरील खत साठा व प्रत्यक्षात खत साठा या मध्ये तफावत आढळून आली. यावरुन सदर विक्रेत्यांनी खत नियंत्रण आदेश 1985 चे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी घेऊन जास्तीची तफावत आढळून आलेल्या दुकानाचे खत परवाने 10 ते 12 दिवसासाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी निलंबीत केले आहेत.
यामध्ये बिरादार कृषि सेवा केंद्र उदगीर, ऐश्वर्या कृषि सेवा केंद्र उदगीर, पार्वती कृषि सेवा केंद्र उदगीर, बालाजी सीड्स कंपनी उदगीर, आनंदवन कृषि सेवा केंद्र उदगीर, स्वाती अग्रो एजन्सीज उदगीर, मोमले कृषि सेवा केंद्र उदगीर, साईकृपा कृषि सेवा केंद्र उदगीर व गजानन फर्टिलायझर्स वाढवणा पा. , ओम फर्टिलायझर्स उजनी मोड ता. औसा, अशा १० दुकानांचा समावेश आहे.
यापुढे खत विक्री केंद्रावर ई-पास वरील साठा, प्रत्यक्षात साठा व साठा नोंदवही तील साठा यामध्ये तफावत आढळून आल्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कडक कार्यवाही करण्याचा इशारा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , लातूर यांनी दिला आहे.
0 Comments