GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे काम सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेऊन : जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे  काम सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेऊन : जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

केंद्र सरकारच्या  7  वर्ष पूर्ती बद्दल कोरोना योध्यांचा सत्कार


उदगीर : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार येऊन 7 वर्ष  पूर्ण झाल्यामुळे भाजपाच्या वतीने  वाढवणा आरोग्य केंद्र व उपकेंद्र किनी यल्लादेवी, डोंगरशेळकी, एकुर्का रोड येथील वैद्यकीय अधिकारी,  आरोग्य कर्मचारी, ANM,आशा वर्कर यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात  आला . 
अतिशय गंभीर परिस्थिती मध्ये सर्वजण आपलें कर्तव्य निभावून रुग्णांची सेवा करत आहेत.त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज ठेवत आहोत असे राहुल केंद्रे पुढे बोलताना म्हणाले.  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार चे 7  वर्ष  पूर्ती निमित्त कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सभापती संगम अष्टुरे,पोलीस उप निरीक्षक जोंधळे साहेब,  माजी उप सभापती रामदास बेंबडे, माजी सरपंच दत्ता भाऊ बामणे, पंचायत समिती सदस्य महादेव कांबळे, उपसरपंच सोनू माळी,रामानंद हवा, बबन भांगे, संतोष केसगिरे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कापसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कानवटे मॅडम, व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments