ग्रामीण पोलिसांनी पकडला अवैध दारुसाठा;
१ लाख ८३२०० रुपयाचा मुद्देमाल जप्त
उदगीर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजे पर्यंत संचार बंदी लागु आहे.
ग्रामीण पोलिसांना गस्तीच्या वेळी हेर येथील वाघोबा चौकात दि. २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता. एका गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना बातमी मिळाली की एका लाल रंगाचे कार मध्ये देशी दारू चोरुन विक्री व्यवसाय करत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर वाघोबा चौकात 06.20 वाजता ग्रामीण पोलीसांनी छापा मारला असता त्या ठिकाणी एका लाल रंगाची कार क्रमांक एम.एच.02 बी.डी.8742 गाडी उभी होती. त्यामध्ये एक व्यक्ती आला. त्याचे नाव रमेश उर्फ छोटू ज्ञानोबा मस्के वय 30 वर्षे रा बाभळगाव ता. जि. लातुर, ह.मु. वडवळ ता. चाकूर असे असुन सदर गाडी मध्ये देशी दारू भिंगरी संत्राचे 15 बॉक्स ग्रामीण पोलिसांनी जप्त केले. त्यामध्ये देशी दारू भिंगरी संत्राचे 15 बॉक्स एकुण किंमत - 43200/- रुपये, एक लाल रंगाची कार होंडाई कंपनीची गाडी किंमत अंदाजे 140000/- रुपये असे एकुण 183200/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला करुन पो.ना. नामदेव सारुळे यांच्याफिर्यादीवरुन प्रोगुरन १४२/२०२१ कलम ६५ (अ) , (इ) म.दा.का. सह कलम १८८ भादवीसह कलम २,३,४ साथ रोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी डॅयनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक घारगे,पोलीस नाईक नामदेव सारुळे, पो.का. राहुल गायकवाड, दयानंद सूर्यवंशी, कृष्णा पवार,संतोष शिंदे आदींनी परिश्रम घेतले. पुढील तपास पो.ना. घोडके करत आहेत.
0 Comments