ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

केंद्राचा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा - राज्यमंत्री संजय बनसोडे

केंद्राचा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा - राज्यमंत्री संजय बनसोडे


 
मुंबई : जगभरासह देशभरात आणि महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून कोविडचे सावट होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या पण हा अर्थसकंल्प घोर निराशा करणारा असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

कोविड आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वसामान्य, शेतकरी, कामगार हवालदिल झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीतरी चांगले मिळेल अशी अपेक्षा होती पण हा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा ठरला आहे. पहिले डिजिटल बजेट अशी प्रसिध्दी करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन मतदारांना आर्कर्षित करणाऱ्यासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत, हे  महाराष्ट्रासाठी चांगली बाब नाही. कोविडमुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठया घोषणा होतील अशी अपेक्षा होती परंतु या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटयाला काहीच आले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अधिकची तरतूद आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आली आहे हीच काय ती समाधानकारक बाब आहे. या अर्थसंकल्पात वैद्यकीय क्षेत्रासाठी एकूण 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post