ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

रंगकर्मीचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार 20 फेब्रुवारीला वितरण

रंगकर्मीचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार 20 फेब्रुवारीला वितरण


 उदगीर : येथील रंगकर्मी  साहित्य, कला , क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्यिक सामाजिक, कृषी, कला क्षेत्रात  उत्कृष्टकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मागील पाच वर्षापासून पुरस्कार देऊन गौरव केला जातो.  यावर्षीचे रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी जाहीर केले. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.  राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून लासलगाव, नाशिक येथील सचिन होळकर यांना कृषि, निलंगा येथील निवृत्त नायब तहसीलदार एन. आर.  स्वामी यांना सामाजिक , लातूर येथील साहित्यिक व्यंगचित्रकार प्रकाश घाडगे यांना कला, जळकोट येथिल साहित्यीक विलास सिंदगीकर, आंबादास केदार यांचा साहित्य , लातूर येथील संगीता फुलचंद कासार, सांगलीचे राजाराम तायाप्पा माने गडचिरोली येथील बोरकुटे अशोक, उस्मानाबाद येथील भावना चौधरी, उदगीर येथील सौ. अनिता येलमटे ,नांदेड येथील संध्या प्रमोद कुलकर्णी ,दिपाली संजय कुलकर्णी, उदगीर येथील नीता मोरे, रामेश्वर पटवारी  , औरंगाबाद सलिम अहमद आत्तार,  उदगीरच्या राचम्मा मळभागे,  पुणे येथिल अर्चना पाटील यांचा शैक्षणिक कार्याबद्द शैक्षणिक कार्याबद्दल डॉक्टर प्रशांत नवटक्के यांना आरोग्यसेवेबद्दल तर मुंबई पोलीस दलातील  श्रीकांत देशपांडे यांचा  धाडसी कार्याबद्दल विशेष कार्य गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, मारोती भोसले ,अॅड विष्णू लांडगे,  अॅड महेश मळगे, महादेव खळूरे, दत्तकुमार स्वामी,  प्रा.डॉ. संग्राम गायकवाड, प्रा.डॉ. विजयकुमार कल्लुरकर, रसुल पठाण, सिद्धार्थ सुर्यवंशी, रामदास केदार, सचिन  शिवशेट्टे, इरफान शेख, प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल, अनमोल कवडेकर, आकाश कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post