ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

आष्टामोड ते उदगीर रस्त्याच्या कामाची गती वाढवावी - राज्यमंत्री संजय बनसोडे

आष्टामोड ते उदगीर रस्त्याच्या कामाची गती वाढवावी - राज्यमंत्री संजय बनसोडे


रस्ता वाहतूकीसाठी एक बाजू त्वरीत पूर्ण करा

उदगीर : आष्टामोड ते उदगीर रस्त्याचे काम चालू असून या कामाची कंत्राटदाराने गती वाढवून काम दर्जेदार करण्याचे राज्याचे निर्देश पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. 
आष्टामोड ते उदगीर या कामास राज्यमंत्री  श्री.संजय बनसोडे यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी औरंगाबाद विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब साळुंके, उपअभियंता अशोक इंगळे, टिम लिडर दिपक गोयल, एस.आर.शिंदे,कंत्राटदार गजानन पोकलवार यांच्यासह बस्वराज पाटील नागराळकर, शिवाजीराव मुळे  सिघ्देश्वर पाटील इत्यादी उपस्थित होते.
यावेळी  राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, पावसाळयापूर्वी आष्टामोड ते उदगीर रस्त्याच्या  एक बाजूचे काम पूर्ण करुन या रस्त्यावरील 13 पूलाचे बांधकाम जून पर्यंत पूर्ण करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. या रस्त्याच्या कामा बाबत काही अडचणी असतील तर तहसिलदार,संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडचणी सोडवून कामे पूर्ण करावेत. या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा असे ही यावेळी त्यांनी सूचित केले. 
                                                  

Post a Comment

Previous Post Next Post