ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिर;बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्या सुस्मिता माने यांचा स्तुत्य उपक्रमउदगीर :

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी; बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते उद्घाटन 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्या सुस्मिता माने यांचा स्तुत्य उपक्रम


   उदगीर : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्या सुस्मिता माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा उदगीरचे पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, शफी हाशमी,  सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे,  विक्की गवारे, अजय जाधव,  प्रा. एस.एस. पाटील, डॉ. तन्वीर पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हणमंत पिंपळे, अजित जाधव, आशिष गायकवाड, शरद मादळे, विजयकुमार उपाडे, प्रियांशू मादळे, विनोद मादळे आदींनी परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post