ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी दिल्या सांत्वनपर भेटी

लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी दिल्या सांत्वनपर भेटी 


   जळकोट : तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे हे जळकोट तालुक्याचा दौऱ्या काढुन कोळनूर येथील शंकर चोले यांनी विषारी औषधं प्राशन करून आत्महत्या केली होती त्यांच्या घरी भेट सांत्वन पर भेट दिली. तसेच केकत सिंदगी येथील आदर्श शिक्षक शिवाजी इंद्राळे यांचा हृदय विकाराने आकस्मात मृत्यू झाला त्यांच्याही घरी केंद्रे यांनी भेट दिली व  कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, भाजपा जळकोट तालुकाध्यक्ष अरविंद पाटील नागरगोजे, अनु. जाती. मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊराव कांबळे, संजय पाटील,नारायण चाटे, जनार्दन चोले, रमेश चोले, सुरेश चोले, राम चोले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post