ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

29 जानेवारी 2021 रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत

29 जानेवारी 2021 रोजी 
सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत


  लातूर : लातूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी लातूर यांचे उपस्थित दि. 29 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता डी.पी.डी.सी. हॉल, प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
तालूकास्तरीय सरपंच पदाचे आरक्षण पूढील प्रमाणे आहे. एकूण ग्रा.प. संख्या 110, अनु.जाती. सरपंच पदे एकूण 23 त्यापैकी महिला 12, अनु.जमाती पदे 02 त्यापैकी 01 महिला,ना.मा.प्र. पदे 30 त्यापैकी 15 महिला व सर्वसाधारण पदे 55 त्यापैकी 27 महिला इत्यादी पदांचे सरपंच आरक्षण या सोडतीमध्ये काढण्यात येणार आहे.लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी सदरील सोडत बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                             

Post a Comment

Previous Post Next Post