ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उद्योग उन्नयन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उद्योग उन्नयन 
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर -    केंद्र शासनाने अत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केलेले आहे. यासाठी लातूर जिल्हयातील अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत वैयक्तीक लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वंयसहायता गट आणि सहकारी उत्पादक यांना लाभ देण्यात येणार आहे.
          या अनुषंगाने सद्यस्थितीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील वैयक्तीक लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वंयसहायता गट आणि सहकारी उत्पादक यांनी कार्यालयीन वेळेत निम्न स्वाक्षरीत यांचे कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त ,समाज कल्याण लातूर यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post