ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

२८ रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आदोंलन करणार : प्रहार जनशक्ती

२८ रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आदोंलन करणार : प्रहार जनशक्ती


उदगीर : नगर परिषदेतील दिव्यांगाचा शासन निर्णय 5% टक्के निधी वितरण न झाल्यामुळे दिव्यांगाचा निधी येत्या आठ दिवसांत निधी त्वरित वितरण न केल्यास दि. 28 डिसेंबर
 रोजी मा.उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्व प्रहार सेवक व दिव्यांग बांधवांच्या वतीने ठिय्या आदोंलन करण्यात येणार आहे व मागील अनेक वर्षाचा आणि गत वर्षी 2019 मध्ये नगर परिषद उदगीर यांनी प्रति व्यक्ती सहा हजार रुपयाची मुंजरी करून प्रति व्यक्ती लाभार्थी यांना तीन हजार रुपये दिले होते. दिव्यांगाचा शासन निर्णय निधी त्वरित वितरण करून दिव्यांगाना न्याय देण्यात यावा यासाठी दि.21 डिसेंबर रोजी उपजिल्हाधिका-यांना प्रहारच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनावर प्रहारचे उदगीर तालुकाध्यक्ष 
विनोद तेलंगे, रविकिरण बेळकुंदे तालुका कार्याध्यक्ष,अविनाश शिंदे ता. सरचिटणीस, महादेव आपटे ता. सचिव , कांबळे विशाल , संदीप पवार ता उपाध्यक्ष, महादेव मोतीपवळे  उपाध्यक्ष, निळकंठराव मुदोळकर चिटणीस, रवि आदेप्पा ता चिटणीस, बालाजी बिरादार, दत्ता भारती, संदीप सूर्यवंशी, सचिन कांबळे,प्रयागबाई गायकवाड, केरबा गायकवाड, कलुबाई घरने,गणेश कांबळे, संगम वडले, महादेव भंडारे
सरस्वती मादळे, लक्ष्मीबाई कांबळे, संगीता मोरतळे सर्व दिव्यांगबांधव व प्रहार सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post