ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

इच्छापूर्तीची कु.संस्कृती सावळे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत राज्यात तृतीय

इच्छापूर्तीची कु.संस्कृती सावळे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत राज्यात तृतीय


   उदगीर : येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या, नामवंत अशा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसची इयत्ता सहावीतील  विद्यार्थीनी कु.संस्कृती जगदीश सावळे ही राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेत महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावली आहे. 
     महाराष्ट्र पी.टी.ए च्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर पी.टी.ए च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सानेगुरुजी कथाकथन स्पर्धेत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या भाग घेतलेल्या एकूण 112 स्पर्धकांमध्ये कु.संस्कृती जगदीश सावळे ही तृतीय क्रमांक पटकावली आहे. तीला इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृतीच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे मंत्री संजयजी बनसोडे,   महात्मा गांधी बँकेचे सर्वेसर्वा चंद्रकांत वैजापुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मा.राहुल केंद्रे, मराठवाड्याचे शिक्षक आ.सतीशजी चौहान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, पी.टी.ए चे राज्य कार्याध्यक्ष प्रा.विकास कदम, राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके,  पी.टी.ए चे तालुका सचिव प्रा.प्रदीप वीरकपाळे यांच्यासह   सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व लातूर व उदगीर पी.टी.ए च्या अनेक पदाधिकारी व सदस्यांनी मार्गदर्शक प्रा.पटणे व विजेती चिमुकली कु.संस्कृती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post