ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात मद्य विक्रीस बंदी

कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात 
मद्य विक्रीस बंदी

       लातूर :  कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या दि. 8 डिसेंबर 2020 च्या  पत्रकान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2020 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या संदर्भात  लातूर जिल्हयाच्या शेजारील  कर्नाटक  राज्याच्या बिदर या जिल्हयात पहिल्या फेरीतील मतदान दि. 22 डिसेंबर 2020 व दुसऱ्या फेरीतील मतदान दि. 27 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे.
त्याअर्थी या निवडणूकी संदर्भात होत असलेल्या मतदानाची  प्रक्रिया  मुक्त व निर्भयपणे  आणि शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व कायदा  व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये,  या करिता मुंबई दारुबंदी कायदा  1949 चे कलम 142 (1) अन्वये कर्नाटक राज्यालगत 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान होत असलेल्या ठिकाणी  मद्यविक्रीशी संबंधित सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दिले आहेत. 
पहिल्या फेरीतील मतदान दि. 22 डिसेंबर 2020
कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात (मतदान होत असलेल्या गावांपासून), मतदानाच्या आगोरदचा दिवस  अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख दि. 21 डिसेंबर 2020 संबंधित गाव- मौजे औराद, कासार बालकुंदा,कासार शिरसी व कडमुगळी ता.निलंगा जि.लातूर. कर्नाटक राज्याच्या  5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात (मतदान होत असलेल्या गावांपासून),मतदानाचा दिवस दि.22 डिसेंबर 2020. कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात (मतदान होत असलेल्या गावांपासून), मतदानाच्या आगोदरचा दिवस दि. 26 डिसेंबर 2020 मौजे तोगरी ता.उदगीर व मौजे लासोना, वलांडी ता.देवणी जि.लातूर कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात (मतदान होत असलेल्या गावांपासून), मतदानाचा  दिवस  दि. 27  डिसेंबर 2020. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक  कार्यवाही करण्यात यावी याची  सर्व संबंधित  अनुज्ञप्तीधारकांनी  नोंद घ्यावी, असे ही  आदेशात नमुद केलेले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post