ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

नवतंत्रज्ञानाला चालना देणारी साहित्यकृती म्हणजे जाॕर्ज सिक्रेट कि टु द युनिव्हर्स होय - विनय पाटील

 नवतंत्रज्ञानाला चालना देणारी साहित्यकृती म्हणजे जाॕर्ज सिक्रेट कि टु द युनिव्हर्स होय - विनय पाटील



 उदगीर : बदलत्या काळानुसार संकल्पना व कृती बदलत राहिल्या पाहिजे. हे बदल स्विकारत असताना त्या त्या काळातील तंत्रज्ञाचा वापरही स्विकारला पाहिजे. याच विचाराच्या जाॕर्जची विचारसरणी व त्यातुन त्याने केलेली दैदिप्यामान प्रगती हि नवतंत्रज्ञानाच्या युगात सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे . या सर्व बाबींचा सखोल लेखा-जोखा असलेली व नवतंत्रज्ञानाला चालना देणारी साहित्यकृती म्हणजे जाॕर्ज सिक्रेट कि टु द युनिव्हर्स होय असे मत विनय बबीता बळीराम पाटील या विद्यार्थ्यांने व्यक्त केले.

   चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत संपन्न झालेल्या २३० व्या वाचक संवादचे अध्यक्षस्थान संवादक विनय पाटील यांच्या शाळेचे प्राचार्य अभिजीत नळगीरकर यांनी भूषवले. यावेळी  विनय पाटील या विद्यार्थ्यांने लुसी आणि स्टिफन हाॕकिंग लिखित जाॕर्ज सिक्रेट कि टु द युनिव्हर्स या ईंग्रजी साहित्यकृतीवर मराठी व ईंंग्रजी या दोन्ही भाषेतुन संवाद साधताना काॕसमाॕस या महा कॕम्पुटरच्या शोधाची व त्याच्याशी निगडीत इतर बाबींचा सखोल इतिवृतांत सांगितला. विनयने आभ्यासपुर्ण हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेळके मॕथ्स क्लासेस येथे प्रत्यक्ष व फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादानंतर झालेल्या चर्चेत  विनयची बहिण कु.नम्रता पाटील, प्रा.संभाजी जाधव, प्रतिभा मुळे, गोविंद सावरगावे, विनयचे शिक्षक भालेराव यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी विनयचे प्राचार्य अभिजीत नळगीरकर  यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम  यांनी केले तर आभार विनयची आई बबीता पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post