ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सर्वांना सोबत घेऊन चालण्याची दृष्टी पवार साहेबांतच - राज्यमंत्री संजय बनसोडे


सर्वांना सोबत घेऊन चालण्याची दृष्टी पवार साहेबांतच - राज्यमंत्री संजय बनसोडे


उदगीर : "सर्वांना घेऊन चालण्याचे कौशल्य व दृष्टी शरदचंद्र पवार यांच्याकडे असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरदचंद्रजी पवार  नेत्र रुग्ण धर्मशाळेचे भुमीपुजन ही बाब त्यांच्या सामाजिक लौकिकाला साजेशी आहे"असे प्रतिपादन  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

उदयगिरी लाॕयन्स नेत्र रुग्णालयाच्या मा.शरदचंद्रजी पवार नेत्ररुग्ण धर्मशाळेच्या भुमीपुजनाच्या व बारा बलुतेदार कामगारांची नेत्रतपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर होते तर व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील,पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ .शिवाजी मुळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले , माजी उपसभापती बाबासाहेब काळे,लाॕयन्स नेत्ररूग्णालयाचे अध्यक्ष डॉ .रामप्रसाद लखोटिया,सचिव प्रदीप बेद्रे, प्रा.महेश बसपुरे उपस्थित  होते.
   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक कार्याचा वसा चालविण्याचे कार्य लाॕयन्स नेत्र रुग्णालयच्या माध्यमातून होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी यावेळी बोलताना केले.उदगीरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे कार्य चालू असून महत्त्वाचे व मोठे प्रश्न सोडविले जात आहेत.उदगीर मतदारसंघाचा कायापालट होण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले . यावेळी खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रशस्रक्रिया झालेल्या रूग्णाच्या हस्ते केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post